प्रकाश आंबेडकरांना अटक करावी-नारायण राणे

0

(Pune)पुणे : दंगली होणार असल्याचे भाकित करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अटक व्हायला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री आणि (BJP Rajya Sabha MP Narayan Rane)भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक असे का बोलतात? त्यांनी घरी बसायला पाहिजे, असेही राणे म्हणाले.

आंबेडकर यांनी दंगली होऊ शकतात, असे भाकित केले आहे. त्यांनी तारीखही दिली आहे की तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत असे काही होऊ शकते. खरेच राज्यात अशी परिस्थिती आहे का? पोलिसांना अलर्ट दिलाय का? असा प्रश्न पुण्यात पत्रकारांनी नारायण राणे यांना विचारला.माहिती जर कोणी लपवत असेल, तर तो क्राईम होतो. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे.

दंगलीचा आधार सांगावा…पुरावे द्यावे, कोण करणार? कशी दंगल होणार? कुठे करणार? राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात? त्यांनी घरी बसावे, असा टोलाही त्यांनी लगावला.