
अमरावती Amravati – देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन Hit and run कायद्याच्या विरोधात अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) Dr. Babasaheb Ambedkar Chowk (Irvine) येथे गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज सातव्या दिवशी 21 वाहन चालकांनी उपोषणस्थळी मुंडन आंदोलन करून या हिट अँड रन कायद्याचा निषेध केला.