राहुल गांधीविरोधात तक्रार ,काँग्रेसविरोधात भाजप रस्त्यावर

0

 

नागपूर- उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल करत असताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्हिडिओ काढल्यावरून संघ मुख्यालय नागपूरसह राज्यात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधात भाजपने तक्रार दाखल केली असून अटकेची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस निषेधार्थ ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन सुरू आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आमदार प्रवीण दटके ,शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली महाल टिळक पुतळा शहर भाजप कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपती यांचा अपमान केला, हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, अशा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान यापुढे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा बॅनर्जी व काँग्रेसला दिला.
इंडीया आघाडी मुर्दाबाद, राहुल गांधी विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला.यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रगती पाटील, राज्य महिला मोर्चाच्या वैशाली चोपडे, सरचिटणीस गुड्डू त्रिवेदी, संदीप गवई, भोजराज डुंबे, विष्णू चांगडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष बादल राऊत, चंदन गोस्वामी, श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, प्रमोद चिखले, गुड्डू आदी उपस्थित होते.
सरचिटणीस राम अंबुलकर यांनी संचालन केले.