नागपूर जिल्हा महसूल क्रीडा स्पर्धा 18, 19 फेब्रुवारीला सांस्कृतिक स्पर्धांची मेजवाणी

0

      नागपूर. नागपूर जिल्ह्यातील व विभागातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा होणार आहेत (sports competition has been organized for the revenue department employees). या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पुढील दोन आठवडयात शासकीय सुट्यांच्या काळात ही स्पर्धा होणार (competition will be held during the government holidays) असल्याचे जाहीर करण्यात आले. नागपूर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 18 व 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर विभाग स्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी केली. स्पर्धेंतर्गत क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल फुटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, कॅरम दुहेरी, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जलतरण, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, खो -खो, थ्रो बॉल, पुरुष व महिला गटातील स्पर्धा होणार आहेत.

अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील बैठक झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी डॉ. सुजाता गंधे, पियुष चिवंडे, पूजा चौधरी, शिवनंदा लंगडापुरे, हेमा बडे, शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.