संतापजनक! 10 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न मैत्रिणींनी फोडली घटनेला वाचा : 35 वर्षीय आरोपी अटकेत

0

          नागपूर. नराधमाने स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीवर बळजबरीने अत्याचाराचा प्रयत्न (rape Attempted) केल्याची धक्कादायक व तेवढीच संतापजनक घटना हिंगणा हद्दीत (Hingana area ) उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने भीतीपोटी घटनेची माहिती आई-वडिलांना देणे टाळले. पण, मैत्रिणींना त्याबाबत माहिती दिली. मैत्रिणींनी आपल्या पालकांना याबाबत सांगितले. त्यांनी सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिसांत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी 35 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तुर्त पोलिसांनी विनयभंगासह अत्याचाराचा गुन्हा दाखल (Crime of Rape ) केला असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. विनोद मारोती राऊत (35) रा. बीट बोरगाव) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे मजुरीकाम करणाऱ्या विनोदलासुद्धा 10 वर्षांचीच मुलगी आहे. पण, दारूचे व्यसन असल्याने पत्नी त्याला सोडून गेली आहे. तेव्हापासून तो मुलासोबत राहातो. पीडित मुलीचे आई वडिल देखील मजुरीचे काम करतात. त्यांना पीडितेसह तीन मुली आहेत.

ही घटना 20 दिवसांपूर्वी 21 जानेवारीला दुपारी 12 वाजता घडली होती. पीडितेचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दोन्ही बहिणीसुद्धा खेळायला गेल्या होत्या. पीडिता घरी एकटीच असल्याचे पाहून विनोद मद्यधुंद अवस्थेत घरात शिरला. तिचे दोन्ही आत पकडून जबरदस्ती करू लागला. त्यानंतर पीडितेला कुणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. याप्रकाराने पीडिता घाबरली होती. भीतीपोटी तिने कुणाकडेही घटनेची वाच्यता केली नाही. मात्र, तिला मानसिक धक्का पोहोचला होता. पीडितेने काही दिवसांनी शाळेत तिच्या मैत्रिणींना घटनेची माहिती दिली. मैत्रिणींना समजूतदारपणा दाखवत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली, तेथून हा प्रकार एका एनजीओपर्यंत पोहोचला.

एनजीओने पीडितेला विश्वासात घेऊन सत्य जाणून घ्यायचे होते, मात्र भीतीमुळे ती बराच वेळ बोलू शकली नाही. शेवटी जेव्हा पीडितेने सत्य सांगायला सुरुवात केली तेव्हा विनोदचा खरा चेहरा समोर आला. एनजीओने तत्काळ पोलिसांना कळवले आणि पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विनोदला अटक केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा