रविकांत तुपकरांनी प्यायले डिझेल प्रकृती खालावत असतानाही उपचारास नकार

0

      बुलढाणा: पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत, कापूस आणि सोयाबीनची दरवाढ आदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आरंभलेले आंदोलन (agitation of Swabhimani Shektar Sangathan ) चांगलेच पेटले आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar ) आत्मदहनाचा इशारा देत भूमिगत झाले होते. आज तुपकर अचानक आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी पत्नी व आईसमोरच अंगावर डिझेल ओतून घेतले (Diesel was poured on the body). काही डिझेल त्यांनी प्यायले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळळा. पण, डिझेल पोटात गेल्याने तुपकर यांची प्रकृती सारखी ढासळते आहे. प्रशासनाने त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याची तयारीही दर्शिवली. मात्र, त्याला नकार देत तुपकर आंदोलकांसोबतच दटून राहिले. त्यांच्या काही मागण्या तत्काळ मान्य करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. पण, त्यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मोर्चेकऱ्यांना समोरे जाऊन मागण्या माण्य करून घेण्याचे आव्हान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  तुपकर पोहोचले पोलिसांच्या वेशात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजचे आंदोलन सुरू होताच रविकांत तुपकर या आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांचा गणवेश परिधान करून ते मोर्चात पोहोचले. त्यांनी 11 फेब्रुवारीला आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसा मागावर असल्याने गेले काही दिवस ते परागंद होते. तिकडे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी अंगावर पेट्रोल घेतले. यामुळे एकच खळबळ उडाली.
आंदोलकांकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज  आक्रमकपणे मागण्या मांडूनही प्रशासनाकडून मागण्या मान्य केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमधील संताप वाढतच होता. त्यात तुपकर यांची प्रकृती ढासळत होती. याप्रकाराने शेतकरी अचानक आक्रमक झाले. त्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज करीत आंदोलकांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. आंदोलनस्थळाहून सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

      तुपकर प्रचंड संतापले
आंदोलना दरम्यान तुपकर संतापलेले दिसले. आम्हाला गोळ्या घाला. शेतकऱ्यांना गोळ्या घाला. आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्हाला मारून टाका. हे कसले सरकार. या सरकारला जनतेचे काही पडले नाही. शेतकऱ्यांचे काहीही घेणेदेणे नाही. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे, असा आरोप तुपकर यांनी केला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा