समृद्धीच्या वेगानेच राज्याचा विकास

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पाहणी दौऱ्याला प्रारंभ


नागपूर. मुंबई – नागपूर हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Samriddhi Highway ) ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) आज या महामार्गाचा पाहणी दौरा करीत आहेत. दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. देवेंद्र फडणीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून या प्रकल्पाचे काम सुरू केले. त्याचे आता मुख्यमंत्री म्हणून लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहता येणार असल्याने आनंद आहे. या महामार्गामुळे लोकांची चांगलीच सोय होणार आहे. अत्यंत वेगवान असलेल्या या महामार्गाच्या गती प्रमाणेच राज्याचा विकासही सुसाट स्वरूपात होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. रवाना होताना देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवित असून मुख्यमंत्री त्यांच्या शेजारी बसले होते.


हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांसोबत करीत आहे. नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा खुला होईल. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होईल. नियोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलो आहे.
या मार्गाला कुठलेही डायव्हर्जन नसेल. नागपूर ते शिर्डी सुसाट वेगात पोहोचता येईल. यापूर्वी देखील या महामार्गावर ड्राईव्हिंग केले आहे. आज पुन्हा अनुभव घेतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे, त्यांची तुलाना कुणाशीही होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. गतीमान पद्धतीनेच समृद्धी महामार्गाचे काम केले. याच गतीने राज्याचा गाडा हाकणार आहोत. हा प्रकल्प गेमचेंजर ठरणारा आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहता येणार हे भाग्य आहे. मुंबई-पुणे पहिला हायस्पीड महामार्ग बाळासाहेबांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. आता नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव असल्याचे समाधान आहे. नागपूर ते मुंबई हे १८ तासांचे अंतर अगदी ६-७ तासांवर येणार आहे. ७०१ किमीची रस्ता महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले.

चित्ता कटरा पनीर भुर्जी आणि अमृतसरी पनीर पकोडा|Paneer Bhurji & Amritsari Paneer Pakora Recipe|Epi 46