अहमदाबाद AHMDABAD : मोदी आडनाव अवमान प्रकरणी राहुल गांधी RAHUL GANDHI यांची दोन वर्षांची शिक्षा कायम राहणार असून गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. कोर्टाच्या निर्णयमुळे राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहणार आहे. राहुल गांधीसांठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. राहुल यांच्यावर किमान 10 खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सुरत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
23 मार्च 2023 रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या निकालानंतर त्यांना जामीन मिळाला. दुसऱ्या दिवशी 24 मार्च रोजी त्यांची खासदारकी रद्द झाले होती. या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी राहुल यांनी सुरत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला. यानंतर राहुल गांधी यांनी 25 एप्रिल रोजी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
कर्नाटकमध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील (2019) प्रचारावेळी राहुल यांनी मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली. त्याबद्दल गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींकडे सध्या दोन पर्याय असून ते हायकोर्टाच्या मोठ्या घटनापीठाकडे जाऊ शकतात किंवा थेट ते सर्वोच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान देऊ शकतात.
काय म्हणाले होते राहुल?What did Rahul say?
2019 मधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी ‘सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?’ अशी टिप्पनी केली होती.