Neelam Gorhe ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे शिंदे गटात

0

मुंबई MUMBAI : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश (Neelam Gorhe to join Shinde Camp) घेणार आहेत. (Big Blow for Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे गटाला हा प्रचंड मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. नीलम गोऱ्हे या केवळ आमदारच नाहीत तर विधान परिषदेच्या उपसभापती देखील असल्याने ठाकरे गटाच्या दृष्टीने हा मोठाच धक्का मानला जात आहे. त्यांच्यासोबत दोन मोठे पदाधिकारीही शिंदेच्या गोटात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर दुपारी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत. महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा म्हणून गोऱ्हे यांची ओळख आहे. शिंदे यांच्या बंडानंतर त्या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या.

नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाची चर्चा मागील आठ महिन्यांपासून सुरु आहे. नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात ठाकरे गटातील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या आपल्या पक्षाच्या उपसभापती असून आम्हाला बोलण्याची संधी देत नाहीत, अशी ती तक्रार होती. आदित्य ठाकरेंच्या मुद्यावर झालेल्या वादात ठाकरे गटाच्या आमदारांकडून सभागृहात बोलू देण्याची मागणी झाली होती. तेव्हाचा हा प्रसंग होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात आल्यावर त्यांची कानउघडणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे होते.
ठाकरे गटाचे विधान परिषदेत ११ आमदार असून त्यापैकी विप्लव बाजोरिया ये यापूर्वीच शिंदेसोबत आहेत. तर मनीषा कायंदे या अलिकडेच शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ ३ असून ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर टांगती तलवार आहे.