
(NAGPUR)नागपूर – नागपूर महापालिकेवर काँग्रेस पक्षाकडून विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी दुपारी धडक मोर्चा काढण्यात आला. मनपा मुख्यालयी कार्यकर्त्यांनी माठ फोडले, जोरदार घोषणाबाजीसह प्रकर्षाने महिलांचा संताप पहायला मिळाला. मोर्चेकरी आत जाण्याच्या प्रयत्नात असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले.. नागपूर महापालिकेत मागील वर्षापासून प्रशासक बसले आहेत. काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मुख्य मागण्या म्हणजे शहरात घाणीचे साम्राज्य आहे आणि कचरा उचलणाऱ्या कंपन्या आपले काम करत नाहीत यावर भर होता.शहरात सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, 24 तास पाणी मिळत नाही, चांगले रस्ते अमृत योजनेच्या नावावर ओसीडब्ल्यूने खोडल्याने पावसाळ्यात लोकांना त्रास होत आहे. मनपात प्रशासकराज असल्याने कामे होत नाहीत, खासगी कंपन्या लूट करीत असून प्रशासनाचा कंत्राटदारांवर वचक राहिलेला नाही असे अनेक आरोप (City Congress President Vikas Thackeray)शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ विकास ठाकरे यांनी यावेळी केले. (Abhijit Vanjari)आ अभिजित वंजारी, (Girish Pandav)गिरीश पांडव, (Correspondent Sanjay Mahakalkar)नगरसेवक संजय महाकळकर आदी अनेक पदाधिकारी, मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष कार्यकर्ते हजर होते.