गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा प्रकल्प हा वाघासोबतच इतर प्राण्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पाहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना दोन गेटच्या सुविधांद्वारे व्याघ्र प्रकल्प आणि निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दुहेरी पर्वणी आहे.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पाहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना या परिसरात दोन गेट असून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अनेक प्राण्यांचे दर्शन होत आहे. यामध्ये वाघ, नीलगाय, सांबर, हिरण, बारसिंग, अस्वल अशा विविध प्राण्यांचे दर्शन होते. त्यामुळे पर्यटकांना ही दुहेरी पर्वणी ठरत आहे. एका बाजूला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला व्याघ्र प्रकल्पातील प्राणी असा दुहेरी संगमाचा पर्यटकांना आनंद घेता येतो. खोली गेटद्वारे रोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात आणि पर्यटनाच्या आनंद लुटत असतात. परिणामी शासकीय महसुलामध्ये सुद्धा मोठी वाढ होत आहे.