शेकडो नातेवाईकांसमक्ष चुंबन घेणाऱ्या वराला वधुनं शिकवला असा जन्माचा धडा!

0

लखनौ : लग्नाच्या रिसेप्शनमध्ये स्टेजवर वराने शेकडो नातेवाईकांच्या समक्षच वधुचे चुंबन घेतल्याने संतापलेल्या वधूने वराला मोठा धडा ((Groom Kisses Bride in UP in Wedding Reception) ) शिकवल्याची घटना उत्तर प्रदेशातील संभळ येथे नुकतीच घडली असून सर्वत्र या लग्नाची चर्चा दिसून येत आहे. वराच्या कृतीने संतापलेल्या नवविवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या सामुहिक विवाह योजनेतून २६ नोव्हेंबरला त्या दोघांचा विवाह पार पडला होता. लग्नानंतर त्यांच्या पवासा गावात २८ नोव्हेंबरला लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. रिसेप्शनसाठी वर आणि वधू हे दोघेही स्टेजवर बसले होते व समोर शेकडो पाहुण्यांची गर्दी होती. अशाचत वराने सर्वांच्या समक्षच स्टेजवरच वधूचे चुंबन घेतल्याचा प्रकार घडला.


या प्रकारामुळे वधु चांगलीच संतापली व तिने लगेच स्टेज सोडले व ती आपल्या खोलीत परतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे उपस्थित पाहुण्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. संतापलेल्या वधुची समजूत घालण्यासाठी दोन्ही बाजुचे नातेवाईत तिच्या खोलीत दाखल झाले. मात्र, त्यांनी वधुची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वधुने अशा व्यक्तीसोबत पत्नी म्हणून नांदणार नसल्याचे स्पष्टच सांगितले व थेट पोलिस ठाणे गाठले. तेथे तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली. तिने तक्रारीत स्पष्ट केले की, तिला तिच्या पती सोबत राहायचे नाही. त्याचे असे वागणे आपल्याला मुळीच पटलेले नसू मी घरीच राहणार असल्याचे तिने स्पष्ट केले. जो व्यक्ती शेकडो लोकांच्या समक्ष असे घाणेरडे कृत्य करू शकतो, तो सुधरु शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा तिने तक्रारीत केली आहे. दरम्यान, नवरदेवाने नवरीसोबत चुंबन घेण्याची शर्यत लागली होती, असा दावा केला. त्याचे नवरीने पूर्णपणे खंडन केले आहे. तर काही नातेवाईकांच्या मते नवरदेवाने मित्रांशी लावलेल्या शर्यतीतून हा प्रकार घडला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, या लग्नाची कायदेशीर नोंद झालेली नसल्याने दोघेही घटस्फोट घेऊ शकतात, असा निर्वाळा उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात दिलाय.