ओबीसी जनगणना संकल्प यात्रा चंद्रपुरात दाखल

0

 

ओबीसी जनगणना संकल्प यात्रा  चंद्रपुरात दाखल , 7 जिल्ह्यामंध्ये जनजागृती करून शहरात आगमन, वडगाव फाटा ते दीक्षाभूमी पर्यंत पैदल मार्च

 

(Chandrapur) चंद्रपूरच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित ओबीसी जनगणना संकल्प यात्रा चंद्रपुरात पोहचली. 7 जिल्ह्यामंध्ये जनजागृती करून यात्रेचे शहरात आगमन झाले. यानिमित्ताने वडगाव फाटा ते दीक्षाभूमी पर्यंत पैदल मार्च काढण्यात आला.

ओबीसी राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालय खटला , रोहिणी आयोग ,भारत सरकार, व  निती आयोग नेहमी ओबीसी डेटा ची मागणी करते परंतु 1931 पासून आतापर्यंत ओबीसींची जातिनिहाय जनगणना न झाल्यामुळे भारत सरकारकडे डेटा उपलब्ध नाही. म्हणून अनेक वेळा न्यायालयात अथवा धोरण ठरविताना शासनाला अनेक अडचणी येतात. यामुळे मंडल आयोगाने ठरविलेल्या 52% ओबीसी समुदायावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून जातिनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

महाराष्ट्र राज्यातही जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी ओबीसी जनमानसात जनजागरण व महाराष्ट्र शासनाला अवगत  करण्याच्या उद्देशाने व ओबीसींचे 72वसतिगृह,आधार योजना,26 जानेवारीला काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी व मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये यासाठी ओबीसी जनगणना संकल्प यात्रा सेवाग्राम येथून प्रारंभ झाली होती.  विदर्भातील  वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातून ही यात्रा चंद्रपूर येथे दाखल झाली.