

स्पिक मॅके तर्फे विश्व नृत्य दिनानिमित्त विशेष आयोजन
नागपूर(Nagpur), दि. 28 एप्रिल :
भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा युवा पिढीत प्रसार करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय संस्था स्पिक मॅकेतर्फे विश्व नृत्य दिनानिमित्त उद्या, बुधवार, 29 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना सुजाता महापात्रा यांचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 9 वाजता सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर येथे तर सायंकाळी 7 वाजता साई सभागृह, शंकर नगर, नागपूर येथे सुजाता महापात्रा यांचा ओडिसी नृत्याचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला स्पीक मॅकेच्या निशा कुलकर्णी, आभा मेघे, रवि सातफळे, आभा पराशर आणि अनिल कडवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे वेदांत मांडवगडे यांनी केले आहे.

Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















