भिवापुरला गळा दाबून वृद्धाचा खून

0

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील पेट्रोल पंपाजवळ एका साठ वर्षीय वृद्धाची गळा दाबुन हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. तुकाराम काळसर्पे असे मृतकाचे नाव आहे. स्कार्फने गळा आवळून ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. उमरेड पोलिसांना पेट्रोल पंपाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले पंचनामा करीत शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयाकडे रवाना केला. मात्र, या इसमाची हत्या नेमकी कशामुळे झाली याविषयीचे गूढ कायम असून जवळच्याच खापरी येथील शेतात एका अज्ञात व्यक्तीसोबत त्यांना शेवटचे बघितल्याचे काहींनी सांगितले. या माहितीवरून ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनात विविध पथके तपासासाठी गठीत केली आहेत. लवकरच या खुनाच्या घटनेचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.