नागपूर (Nagpur) :- सरकारने १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर आयडी तयार करण्यासाठी पालकांची परवानगी बंधनकारक करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.
ते म्हणाले, “१८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर आयडी तयार करण्यासाठी पालकांची परवानगी हे अत्यावश्यक झाले आहे. आजकाल मुले सोशल मीडियावर आयडी तयार करतात आणि ते चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. दहावीची परीक्षा पास होईपर्यंत स्मार्टफोन देऊ नये. सोशल मीडियावर सर्व काही सहज उपलब्ध आहे. एकदा विशिष्ट प्रकारच्या पोस्ट पाहिल्यावर त्याच प्रकारच्या इतर पोस्टही दिसायला लागतात. अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही वडेट्टीवार यांनी नागपुरात सांगितले.