
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Score, IPL 2025 Qualifier 1 Match Updates in Marathi : आयपीएलच्या 18 व्या मोसमातील प्लेऑफ सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. क्वालिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत आहे
PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : आरसीबी 2016 नंतर फायनलमध्ये पोहचणार?
पंजाब किंग्सची 2014 नंतर प्लेऑफमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाबने ही कामगिरी केली आहे. तर आरसीबीचा हा सामना जिंकून पहिल्याच झटक्यात अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असेल. आरसीबी याआधी 2016 साली अंतिम फेरीत पोहचली होती.
PBKS vs RCB Live Updates, IPL 2025 : पंजाब विरुद्ध बंगळुरु आमनेसामने, फायनलसाठी जोरदार चुरस
पंजाब किंग्स विरुद्ध बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळणार आहेत. मात्र तरीही पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता पहिल्या फेरीत कोणता संघ अंतिम फेरीत पोहचतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आयपीएल 2025 मधील पहिला क्वालिफायर सामना आज गुरुवारी 29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग क्रिकेट स्टेडियम, इथे करण्यात आलं आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. पंजाब आणि आरसीबी दोन्ही संघ टॉप 2 मध्ये असल्याने त्यांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 1 अतिरिक्त संधी मिळणार आहे. मात्र पहिल्या झटक्यात फायनलमध्ये कोण पोहचणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.