एकाच मंचावर राजकीय नेते

0

पंकजा, धनंजय मुंडे एका मंचावर, फडणवीसही येणार

परळी PARLI – बीड जिल्ह्यातील परळी येथे ‘शासन आपल्या दारी’ SHASHAN APLYA DARI  कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार  Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar या नेत्यांसह कृषीमंत्री धनंजय मुंडे तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची मोठी चर्चा आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे परळी मतदारसंघात हा कार्यक्रम होणार असल्याने या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे नेमका कसा संवाद साधणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे शहरात मोठमोठे बॅनर्स, फ्लेक्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी नांदेड विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते विमानतळावरुन हेलिकॉप्टरने परळीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात २२ हजार लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.