Home Artical Blog वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आज विविध भागांत वीज पुरवठा तात्पुरता खंडित राहणार

वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आज विविध भागांत वीज पुरवठा तात्पुरता खंडित राहणार

0

नागपूर(Nagpur), ८ एप्रिल २०२६: महावितरणच्या महाल आणि सिव्हील लाईन्स विभागांतर्गत वीज यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती आणि उन्हाळा सुसह्य होण्यासाठीची सुरक्षा कामे हाती घेण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण कामांमुळे उद्या, गुरुवार ९ एप्रिल २०२६ रोजी महाल आणि सिव्हील लाईन्स विभागांतील काही भागांत वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे.

या कामांतर्गत महाल विभागातील ११ केव्ही महालगाव वीज वाहिनीवर नवीन ए.बी. स्वीच बसविणे, जम्परिंग करणे आणि झाडांच्या फांद्यांची छटाई करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच ११ केव्ही गणेशनगर आणि ११ केव्ही पलोटी वीज वाहिनीवरही अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे सकाळी ८:३० ते १२:३० या वेळेत घर संसार सोसायटी, पॅन्थर नगर, संघर्ष नगर चौक, देवी नगर, सुरज नगर, न्यू सुरज नगर, पवनशक्ती नगर, भांडे वाडी परिसर, धरती माँ सोसायटी, अंतूजी नगर, अब्बूमिया नगर, तुलशी नगर आणि शैलेश नगर या भागातील वीज पुरवठा बंद राहील. याशिवाय सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० या वेळेत ११ केव्ही गणेशनगर वाहिनी वरील गणेशनगर, शारदा चौक, महावीर नगर, आनंद नगर, भगत कॉलनी, जुनी शुक्रवारी, माळी पुरा आणि तेली पुरा या भागातील वीज पुरवठा बंद राहील.

सिव्हील लाईन्स विभागात सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत ११ केव्ही पलोटी वाहिनी वरीलअनंत नगर, महेश नगर, कोतवाल डोंगा, राठोड लेआउट, गीता सोसायटी, न्यू अहबाब कॉलनी, अराफत कॉलनी, सूरज नगर आणि पलोती नगर या भागातील वीज पुरवठा बंद राहील.

वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य आहे. या कालावधीत संबंधित भागातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करावे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना अखंडित सेवा पुरवण्यासाठी महावितरण प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. या तांत्रिक कामाच्या वेळी वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर