Home LOCAL NEWS पत्रकार भवन ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रदीपकुमार मैत्र, सचिवपदी शिरीष बोरकर, कोषाध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी...

पत्रकार भवन ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रदीपकुमार मैत्र, सचिवपदी शिरीष बोरकर, कोषाध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी यांची निवड

0

नागपूर (Nagpur):- टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच शांततेत आणि एकमताने पार पडली. या निवडणुकीत ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रदीपकुमार मैत्र यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि प्रशासकीय कौशल्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच ट्रस्टच्या सरचिटणीस (सचिव) पदावर शिरीष बोरकर यांची निवड करण्यात आली. संघटन कौशल्य, कामातील सातत्य आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यामुळे त्यांची निवड सर्व सदस्यांच्या सहमतीने करण्यात आली.
उपाध्यक्षपदी प्रभाकर दुपारे, तर कोषाध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी यांची निवड झाली आहे. सहसचिवपदी विवेक पुराडभट यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निवडून आलेल्या संचालक मंडळात विनोद देशमुख, जोसेफ राव, विश्वास इंदूरकर, संजीब गांगुली, महेश उपदेव, भूपेंद्र गणवीर आणि महेंद्र आकांत यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय धर्मेंद्र जोरे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ सहा वर्षांचा राहणार असून, या कालावधीत पत्रकार भवनाच्या सर्वांगीण विकासासाठी, पत्रकारांच्या हिताच्या उपक्रमांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यावसायिक व सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत, टिळक पत्रकार भवन ट्रस्टला अधिक सक्षम आणि सक्रिय बनविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.