
बल्लारपुर(Ballarpur) : बी.आय.टी. पॉलिटेक्निक येथे आय.एस.टी.ई व आय.ई. आय. यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक टीमच्या सहकार्याने प्रोजेक्ट एग्झिबिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले.
स्पर्धेत बी.टेक विभागातून तनू राजपूत हिने “फूड एनर्जी अँड स्प्राउट ईट” या प्रोजेक्ट ला प्रथम क्रमांक पटकावला. तर राधिका हिरडे, प्रज्योत कौर धिल्लोन, उर्वशी किर्तने, मीनाक्षी बोटारे व निशा मारवाडे यांच्या “अॅस्ट्रोबाइट – द फ्युचर ऑफ स्पेस फूड्स” या प्रोजेक्ट ला द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांक समीर कुरेशी, सिद्धांत तडाळवार, लखन पालीवर व रितेश निखाडे यांच्या “स्मार्ट कॉलेज चॅटबॉट” या प्रोजेक्टला मिळाला.
याशिवाय, पदविका विभागातुन “इंटेलिजेंट ए.आय. ट्रॅव्हल एजंट” या प्रोजेक्ट साठी श्रेयल खासरे,प्रगती रुयारकर, तन्वी पानघाटे, निशा चहांदे या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, “ए.आय. बेस जेस्चर होमी ऑटोमेशन,या प्रोजेक्ट साठी मारिया शेख, तृप्ती गहाणे, हर्षदा देवालकर आणि साहिल नक्कावार यांना द्वितीय क्रमांक मिळाला तसेच “अल्कोहोल डिटेक्शन व ऑटोमॅटिक इंजिन लॉकिंग सिस्टीम (Arduino UNO व MQ सेंसर्स आधारित)” या प्रोजेक्ट साठी तन्मय मोरे, श्रावणी नन्नावरे, काजल उपरे, वैदही निकोडे यांना तृतीय क्रमांक पटकाविला अशा विविध प्रोजेक्ट ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून मा. संजय वासाडे (अध्यक्ष) उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. रजनीकांत मिश्रा (संचालक), प्राचार्य, श्रीकांत गोजे (पदविका) , डॉ. झेड .जे .खान , अकॅडेमिक डीन डॉ. सत्यनारायण चांगला ,डॉ. अर्चना निमकर (डीन ऑफ स्टुडंट्स डेव्हलपमेंट सेल) यांचीही उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रशांत वाल्के (विभाग प्रमुख मेकॅनिकल), श्री. विपीन डाभेरे (वर्कशॉप सुपरिटेंडंट), श्री. विशाल पिंपळकर (विभाग प्रमुख इलेक्ट्रिकल), प्रा. सुनील कुंतावार, डॉ. प्रशांत वाटकर (विभाग प्रमुख फूड टेक्नॉलॉजी) प्रा. नीरज बैस (विभाग प्रमुख सिव्हिल) यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बीआयटी पॉलिटेक्निक, आय.एस.टी.ई., आय.एफ.आय. व सांस्कृतिक टीमने परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधन व नवोन्मेषाच्या दिशेने प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
















