राणा दाम्पत्याला तुरूंगात टाकणारे रावण

0

मुख्यमंत्री एकनाश शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

अयोध्या ayodhya . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), मंत्री, आमदार, खासदार व समर्थकांसह अयोध्येत पोहोचले आहेत. तिथे महाआरती करून मुख्यमंत्र्यांनी सोन्याचे धनुष्यबाण भेट दिली. या नंतर तिथे जमलेल्या हजारो समर्थकांना त्यांनी संबोधित केले. हनुमान चालिसा वाचनाऱ्या नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले गेले. हे पाप करणारे रावण आहे की राम, हे सांगा याशब्दात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा ते चुप बसले होते. आमचया सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, आम्ही त्यांचे रक्षण करणार. महाराष्ट्रात आता प्रभू रामांच्या आशिर्वादाने बनलेले सरकार काम करणार आसल्याचा विश्वास त्यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामलल्लांची सोबत महाआरती केली. त्यानंतर शिंदे म्हणाले की, लखनऊ ते अयोध्यापर्यंत संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. अमरावतीत भव्य हनुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. राम मंदिर इथेच निर्माण व्हावे हे बाळासाहेब ठाकरेंसह कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न होते.

मंदिर वही बनाऐंगे तारीख नही बताएंगे हे सारे खोटे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्वसामान्यांचे राम मंदिर साकारण्याचे स्वप्न पूर्ण करीत आहेत. मंदिर इथेच बनविणे सुरू आहे. तारीखही जाहीर केली आहे. टीका करणाऱ्यांना घरचा रस्ताही दाखविला आहे. राम मंदिरासाठी लागेल तेवढे सागवान महाराष्ट्र उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी दिला.
शिवसेनेच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण अयोध्यानगरी भगव्या रंगाने सजविण्यात आली आहे. सर्वत्र शिवसैनिकांची गर्दी दिसत असून रामलल्लांच्या दर्शनाने साऱ्यांनीच समाधानाची भावना व्यक्त केली आहे.