रविकांत तुपकर 2 एप्रिल रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

0

 

बुलढाणा (Buldhana)-स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, २ एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी सातगाव ता.जि.बुलढाणा येथील निर्धार मेळाव्यात केली. त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

रविकांत तुपकरांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. तुपकरांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून, त्यांच्या सभांना लोक गर्दी करीत आहेत.