रामटेक शिवसेनेकडे तर अमरावती भाजपचे

0

 

  नागपूर (Nagpur)-रामटेक लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. सध्या देखील रामटेक शिवसेनेकडेच आहे.त्यावर लवकरच निर्णय होईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी आज स्पष्ट केल्याने भाजपने रामटेकवरील दावा सोडल्याचे दिसते. आता विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट मिळणार का,हा प्रश्न आहे. या तिकिटावरून शिंदे गट आणि बाहेरच्या उमेदवाराला तिकीट नको म्हणून आक्रमक झालेले भाजपचे कार्यकर्ते या पार्श्वभूमीवर सुरू असलेला पेच आज संपण्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात बावनकुळे म्हणाले,आज आमची सीईसी बैठक आहे,ज्या 5 जागा भाजपकडे आहेत त्यावर आज चर्चा होईल. संजय राऊत रोज बेताल बोलत आहेत. जनता धडा शिकवेल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते जहरी टीका करतायत त्यांना जनताच त्यांची जागा मतातून सांगेल. राज्यात 6 ते 7 जागांवर पेच आहे,त्यावर लवकर निर्णय होईल. आम्ही इलेक्शन कॅम्पेन बूथ लेव्हलवर लढतोय,10 वर्षातील सरकारच्या योजना, मोदींचा नमस्कार घरोघरी पोहचवतोय. काही मतभेद होत असतात,बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील मात्र देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी बच्चू कडू,अडसूळ सगळे प्रयत्न करतील,बच्चू कडू सोबत राहतील असा दावा बावनकुळे यांनी केला.