Home Artical Blog राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

0

शेतकरी हिताचा तसेच सकारात्मक, विकासाभिमुख व दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प..!
— आमदार डॉ आशिषराव देशमुख

महाराष्ट्र(Maharashtra) राज्याचा 2026 चा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, सिंचन व शेतीसंबंधित उपक्रमांना दिलेले प्राधान्य निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे आहे. उद्योगधंदे व रोजगार निर्मितीसाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील. महिला सक्षमीकरणाला या अर्थसंकल्पात बळ मिळाले आहे. विशेषतः विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा व प्रकल्पांसाठी केलेल्या घोषणांमुळे या भागाच्या प्रगतीला चालना मिळेल. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे बजेट सकारात्मक आणि दूरदृष्टी असलेले आहे.
दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री बळीराजा योजना, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, नैसर्गिक शेती, नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी  चित्रनगरी, नागपूरमध्ये मेट्रोचं नवं काम, कृषीक्षेत्रात मोठी भांडवली गुंतवणूक, 2047 पर्यंत  राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचा विश्वास यामुळे राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक व विकासाभिमुख आहे, अशी प्रतिक्रिया सावनेरचे भाजपचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली.