

निकालात ३२ विद्यार्थ्यांचे परिश्रम फळाला
शिक्षण ही समतेची गुरुकिल्ली आहे, या विचाराला साकार रूप देत बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी UPSC) २०२५ च्या निकालात उल्लेखनीय यश मिळवले आहे. ‘महाज्योती’मार्फत मार्गदर्शन घेतलेल्या ३२ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत प्रशासन सेवेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. दर्जेदार प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य यांच्या बळावर हे यश शक्य झाल्याची माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. मिलिंद नारिंगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली ‘महाज्योती’ संस्था गेल्या साडेपाच वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण व विद्यावेतनाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणून यंदाच्या यूपीएससी निकालात ‘महाज्योती’च्या ३२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सायली भिका पगार (८७ रँक), रुतुजा अशोक गायकवाड (१०६ रँक), शुभम शरद बेहरे (२२६ रँक), ऋषीकेश रामकिशन पालीमकर (२८३ रँक), वैष्णवी दत्तात्रय येंगे (२९८ रँक), मोहिनी अशोक जगताप (३२३ रँक), अभिषेक अभय ओझरडे (३३६ रँक), हर्षवर्धन हरिषचंद्र पाटील (३४९ रँक), कुणाल एस. अहिरराव (४३० रँक), अभिषेक सुरेश मगदुम (४४९ रँक), धनश्री जीभाऊ अहिरे (४८९ रँक), मनोज रामचंद्र पाटील (४९३ रँक), नंदिनी पाटील (५१२ रँक), निखिल तांबे (५१७ रँक), श्रृती संतोष चव्हाण (५२७ रँक), धनंजय संजय दिघे (५२९ रँक), संकेत सदाशिव कुंभार (५३९ रँक), साईराज पंडीतराव पाटील (५४५ रँक), पारस जयंत मिस्री (५५५ रँक), प्रविण उत्तमराव कोलापे (५८४ रँक), आविष्कार विजय डेरले (५९१ रँक), रोहित तुकाराम मालावेकर (६०१ रँक), सिद्धार्थ लक्ष्मण तगड (६१९ रँक), भाग्यश्री राजेश नाईकेले (६४७ रँक), शिवम राजेंद्र वखरे (६५१ रँक), प्रज्वल नासरे (६७७ रँक), अल्पेश भाऊसाहेब ढवळे (६८७ रँक), रामेश्वर महादु शिंदे (७०५ रँक), सुनिल सुभाष कदम (७२७ रँक), राजश्री शांताराम देशमुख (७५४ रँक), चेतन रामराव ठाकरे (७६२ रँक) व रेणुका दिनेश केकन (९४८ रँक) यांचा समावेश आहे. शिक्षण हेच यशस्वी भविष्याची किल्ली आहे. विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ‘महाज्योती’मार्फत विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर आर्थिक सहाय्यही दिले जाते. संस्थेकडून प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिली जाते. या सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावीपणे करता आली.


विद्यार्थ्यांचे यश दर्जेदार प्रशिक्षणाचे फलित : मंत्री अतुल सावे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२५ च्या परीक्षेत ‘महाज्योती’मार्फत मार्गदर्शन घेतलेल्या ३२ विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष ना. मा. श्री. अतुल सावे यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी राज्यासाठी अभिमानाची बाब असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ‘महाज्योती’ करत असलेल्या कार्याची ही फलश्रुती असल्याचे त्यांनी नमूद केले.
मा. श्री. मंत्री सावे म्हणाले की, ‘महाज्योती’मार्फत विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार प्रशिक्षण, अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य यामुळेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे शक्य झाले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत ‘महाज्योती’ संस्थेमार्फत दिले जाणारे प्रशिक्षण, अभ्यास साहित्य, मार्गदर्शन आणि विद्यावेतनाचे पाठबळ विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण करते. ‘महाज्योती’ ही केवळ प्रशिक्षण देणारी संस्था नसून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शासन सेवेत संधी मिळावी आणि ते देशाच्या प्रशासन व्यवस्थेत सक्षमपणे योगदान देऊ शकतील, या उद्देशाने कार्य करणारे प्रभावी व्यासपीठ आहे. संस्थेमार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील आणि समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरतील, असा विश्वासही मा. श्री. अतुल सावे यांनी व्यक्त केला.

कुणाल शिरसाठे
प्रकल्प संचालक
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),
महाराष्ट्र राज्य, नागपूर
प्रति,
१) मा. संपादक,प्रिंट, ईलेक्ट्रानिक, डिजीटल माध्यम
२) मा.संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
३) मा.जिल्हा माहिती अधिकारी (सर्व जिल्हे)
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















