चंद्रपूर वीज केंद्रात ६७७ रक्तपिशव्यांचे विक्रमी रक्तदान

0

 

CHNDRAPUR चंद्रपूर १३ जानेवारी : २९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेले महानिर्मितीचे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वीज निर्मिती क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करीत असून राज्याला अखंडीत वीज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातुन, शनिवार १३ जानेवारी २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले व त्यात ६७७ व्यक्तींनी रक्तदान केले.

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक डॉ. पी. अनबलगन यांच्या आवाहनास तसेच संचालक(वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (संचलन) संजय मारुडकर, संचालक(प्रकल्प) अभय हरणे, संचालक (खनिकर्म) डॉ.धनंजय सावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक (सं. व सु.-२) पंकज सपाटे तथा मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांच्या नेतृत्वात महारक्तदान शिबीराकरिता स्थानिक पातळीवर आयोजन समिती गठीत करण्यात आली होती.

रक्तदान शिबिराकरिता वर्धापन दिन समितीचे सचिव रवींद्र चौधरी, संयुक्त सचिव राजेश आत्राम तसेच उपमुख्य अभियंते श्याम राठोड, अनिल पुनसे, डॉ.भूषण शिंदे, प्रफुल्ल कुटेमाटे, फनिंद्र नाखले, मिलिंद रामटेके, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, डॉ. संगिता बोदलकर वैद्यकिय अधीक्षक, महाव्यवस्थापक वित्त व लेखा बाहुबली डोडल यांनी व इतर विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि सर्व संघटनाचे प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्था यांनी अथक परिश्रम घेवून विक्रमी महारक्तदान शिबीर यशस्वी केले.

या रक्तदान शिबीरास विविध कर्मचारी/कामगार संघटना, सामाजिक संस्था प्रतिनिधी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचे देखील मोलाचे विशेष सहकार्य लाभले.

या भव्य रक्तदान शिबीरात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, शिकाऊ उमेदवार, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, सी.आय.एस.एफ., एम.एस.एफ कर्मचारी यांनी रक्तदान करुन भरघोस प्रतिसाद दिला. शासकिय रक्तपेढी चंद्रपूर, मेडिकल-मेयो रक्तपेढी नागपूर यांनी रक्त संकलन करण्यास यथोचित सहकार्य केल्याचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी सांगितले.

आजचे कार्यक्रम
रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता ऊर्जानगर वसाहतीत “हॅप्पी स्ट्रीट” तर सायंकाळी ७ वाजता सुफी गीतांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे.