अटल सेतूच्या कार्यक्रमावरून मानापमान! काय घडलं?

0

मुंबई MUMBAI  : मुंबईतील बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंग म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूच्या  Atal Setu उद्घाटनाच्या निमंत्रणाच्या वादावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार आणि खासदारांचे नाव नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून ऐनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे.

मुंबईला रायगडमधील उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू शुक्रवारी मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी ठाकरे गटाला ऐनवेळी निंमत्रण देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार व खासदारांचे नाव नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऐनवेळी निमंत्रण पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. निमंत्रण पत्रिकेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव नाही. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मंत्र्याची नावे आहेत. सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांची नावे आहेत. मात्र त्या ठिकाणचे स्थानिक खासदार अरविंद सावंताचे नाव नाही, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.