
मुंबई : एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राज्य महिला अध्यक्षपदी (Rohini Khadse) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या विद्या चव्हाण यांच्या जागी अध्यक्षा झाल्या आहेत. रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत. एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक ही भाजपाकडून लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत गेल्या होत्या. आता रोहिणी खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















