रोहित पवारांनी मला शिकवू नये

0

पुणे (Pune), 19 मार्च कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या सीमाही माहिती नसताना मी लढलो आणि निवडून आलो. त्यामुळे मला रोहित पवारांंनी शिकविण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील १८ घटक पक्षांची विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका भाजपकडून पुण्यात घेण्यात येत आहे. या बैठकांनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत अशीच बैठक घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत “घरे फोडणे हेच भाजपचे काम असून, चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरातून निवडणूक लढवायची नव्हती म्हणून ते पुण्यात आले,’ अशी टीका केली होती. यावर पाटील यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले.

पाटील म्हणाले, “रोहित पवार क़ाय विश्लेषण करतात त्याच्याशी माझा संबध नाही. मात्र, ते हुशार राजकारणी असतील आणि त्यांनी त्यावेळेचे सर्वे रिपोर्ट पाहिले असतील तर कोल्हापूरचे तर १० पैकी ४ मध्ये चंद्रकांत पाटील निवडून येतील असा स्वत: अमित शहांच्या गृह विभागाचा रिपोर्ट होता. मात्र, स्वत: अमित शहांनी मला भविष्यातील काही गणिते लक्षात घेऊन मला पुण्यातून लढण्याच्या सूचना केल्या.’