
Sachin Tendulkar : क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच पर्वणी असणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ उतरणार असून संघाची घोषणा करण्यात आली आहे. :
या स्पर्धेत इंडिया मास्टर्स, श्रीलंका मास्टर्स, वेस्ट इंडिज मास्टर्स, ऑस्ट्रेलियन मास्टर्स, दक्षिण अफ्रिका मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स या संघाचा समावेश आहे.
या स्पर्धेत इंडिया मास्टर्स संघाचं नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करणार आहे. यासाठी भारताच्या 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय संघात खेळलेल्या खेळाडूंचा या संघात समावेश आहे.
मास्टर्स लीगसाठी भारतीय संघ : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)(कर्णधार), युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, विनय कुमार, शाहबाज नदीम, राहुल शर्मा, गुरकीरत सिंग मान, अभिमन्यू मिथुन, पवन नेगी,नमन ओझा.