त्यांच्याकडे कागदावरची शिवसेना संजय राऊतांयांचा शिंदे गटाच्या आरोपांवर पलटवार

0

मुंबई. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena is the name of the party and the bow and arrow symbol) मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर जोरदार आरोप केले जात आहे. ठाकरे गटाने शिवगर्जना यात्रेच्या (Shiva Garjana Yatra ) निमित्ताने पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. या यात्रेद्वारे जनतेसोबत संवाद साधला जात आहे. त्याच शृंखलेत रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची रत्नागिरीच्या खेड येथे जाहीर सभा होते आहे. या सभेवरू देखील शिंदे गटाकडून टोकाचे आरोप करण्यात येत आहेत. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी या आरोपांनंतर जोरदार पलटवार केला आहे. शिंदे गटाला कागदावर नाव आणि चिन्ह मिळाले. पण शिवसैनिक आणि जनता मिळाली नाही. शिवसैनिक आणि जनता कुणाला द्यायची, त्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही. हा कागदावरचा निर्णय आहे, कागदावरच राहील. त्यांच्याकडे केवळ कागदावरची शिवसेना असल्याचे राऊत यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

खेड येथील सभेच्या पार्श्वभूमीवर ‘ठाकरे गटाचे उरलेले पदाधिकारी सोडून जाऊ नये, म्हणून ठाकरे गटाकडून अशा प्रकारच्या सभा घेतल्या जात आहेत’, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली. या टीकेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, ज्यांना निघून जायचे होते, ते निघून गेले आहे. आता सगळे निष्ठावंत उरले आहेत. ज्यांना पळून जायचे होते, ज्यांना पलायन करायचे होते, असे सगळे लोक निघून गेले आहेत. ते निघून गेल्यानंतर आजही शिवसेना त्याच ताकदीने उभी आहे. निघून गेलेल्या लोकांमुळे शिवसेनेवर अजिबात परिणाम झाला नाही. शिंदे गटाला कागदावर नाव आणि चिन्ह मिळाले. पण शिवसैनिक आणि जनता मिळाली नाही. शिवसैनिक आणि जनता कुणाला द्यायची, त्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही. हा कागदावरचा निर्णय आहे, कागदावरच राहील.

अतिविराट सभेचा दावा

आज संध्याकाळी कोकणात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा अतिविराट होईल. कोकण कायमच शिवसेनेचा गड राहिला आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये कोकणचे योगदान मोठे राहिले आहे. कोकणाने नेहमी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात अशाप्रकारच्या अनेक सभा होतील. उद्धव ठाकरे स्वत: तिथे जाणार आहेत. यानंतरची सभा मालेगावात होणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.