अकोला जीएमसीच्या वसतिगृहात भीषण पाणीटंचाई

0

चुळ भरायलाही पाणी नाही, विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात


अकोला. अशोक वाटिका चौकातील उड्डाणपुलाखाली फुटलेल्या जलवाहिनीमुळे (water channel burst under the flyover at Ashok Vatika Chowk ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा (Government Medical College) पाणीपुरवठा बाधित झाला आहे. परिणामी महापालिकेकडून टँकरव्दारे जीएमसीमधील वसतिगृहांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याच्या तक्रारी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. पाण्याच्या मागणीसाठी सुमारे 70 विद्यार्थ्यांनी जीएमसीच्या प्रशासकीय इमारतीसमोर शनिवारी ठिय्या दिला होता. रविवारी टँकरव्दारे पाणी पुरविले गेले तरीही सकाळी अनेक विद्यार्थ्यांना ब्रश करायला आणी गुळणी करण्यासाठीही पाणी नव्हते (There was no water to brush) असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी दिला आहे. सर्वोपचार रुग्णालयातील शस्त्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी मुबलक पाणीपुरवठ्याची गरज आहे. मात्र अशीच टंचाई काही दिवस राहिल्यास शस्त्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यताही डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते.
4 हजार लीटरचे 6 टँकर
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या माहितीनुसार 4 हजार लीटरचे 6 टँकर मिळाले आहे. या पाण्यातून दुपारपर्यंतचा वापर होईल. मात्र वसतिगृह, विद्यार्थीसंख्येप्रमाणे मागणीनुसार हे पाणी कमी पडत असल्याचे वसतिगृहातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पाणीटंचाईमुळे केवळ प्रशिक्षणार्थी डॉक्टरच नाहीत तर रुग्ण व त्यांच्यासोबत असणारे नातेवाईकही त्रस्त आहेत.
रुग्णांचीही गैरसोय
जीएमसीमधील पाणीटंचाईची माहिती विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनाही दिली आहे. त्यांनी अधिकचे पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. हॉस्पीटलच्या वार्डांमध्येही पाणी नाही. रुग्णांनाचीही प्रचंड गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने त्रागा व्यक्त केला जातो आहे.
…तर जीएमसीने पाणी विकत घ्यावे
महापालिकेकडून आवश्यक पाण्याचा पुरवठा केला जात नसेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने स्थानिक खरेदीच्या अधिकाराचा वापर करून पाणी विकत घेऊन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा