
मुंबई-विधिमंडळ अधिवेशन पार पडल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची महत्वाची बैठक होणार असून वायबी सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत दुपारी ही बैठक होणार आहे. या बैठकीत १५ ऑगस्टनंतर सुरु होणारे शरद पवारांचे महाराष्ट्र दौरे, पक्षचिन्ह कायम ठेवण्यासाठी डावपेच तसेच इतर मुद्यांवर चर्चा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पडून महिना झाला आहे. त्यातच अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष चिन्ह गेले तर काय करायचे, या अनुषंगाने चर्चा होणार आहे. १५ ऑगस्टपासून शरद पवारांचे महाराष्ट्र दौरे सुरु होणार आहेत. बीड, उस्मानाबादमधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पक्षावर ताबा कायम रहावा, यासाठी सध्या शरद पवार गटाला जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र भरुन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा करायची आहेत. त्यासाठी या बैठकीत काही निर्णय होतील. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठकही आज होणार आहे.