

चंद्रपूर, १५ जून २०२५:आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल), भारतातील आघाडीची टेस्ट प्रिपरेटरी संस्था, अभिमानाने जाहीर करते की चंद्रपूरच्या शाश्वत कुट्टरमा याने NEET UG 2025 या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत AIR 897 मिळवून जिल्हा टॉपर म्हणून घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांची समर्पणभावना, शैक्षणिक शिस्त आणि एईएसएलच्या जागतिक दर्जाच्या कोचिंग व मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले. ही निकालांची अधिकृत घोषणा काल नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे करण्यात आली.
शाश्वत हा एईएसएलच्या क्लासरूम प्रोग्रामचा विद्यार्थी होता, जो खास NEET परीक्षेसाठी तयार करण्यात आलेला आहे – ही परीक्षा जगातील सर्वाधिक कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक मानली जाते. शाश्वतने आपल्या यशाचे श्रेय एईएसएलने दिलेल्या मजबूत शैक्षणिक पाया, संकल्पनात्मक स्पष्टता आणि सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध अभ्यास पद्धतीला दिले आहे.
शाश्वत म्हणाला; “मी आकाशचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी या संपूर्ण प्रवासात माझे योग्य मार्गदर्शन केले. संरचित अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षकांचे शिक्षण व वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे मी अवघड विषय अतिशय कमी वेळात आत्मसात करू शकलो. एईएसएलशिवाय हे यश शक्यच झाले नसते.”
डॉ. एच. आर. राव, एईएसएलचे प्रादेशिक संचालक, यांनी अभिनंदन करताना सांगितले: “NEET UG 2025 मध्ये आमच्या विद्यार्थ्याच्या चमकदार कामगिरीबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. देशभरातून २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. अशा स्पर्धात्मक परीक्षेत इतके चांगले गुण मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व चिकाटीचे फलित आहे, तसेच त्यांच्या पालकांचा पाठिंबा आणि आमच्या शैक्षणिक टीमच्या समर्पित प्रयत्नांचेही द्योतक आहे. आम्ही त्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
NEET ही परीक्षा दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेतली जाते. ही परीक्षा भारतातील MBBS, BDS आणि AYUSH (BAMS, BUMS, BHMS आदि) पदवी अभ्यासक्रमांसाठी तसेच विदेशात प्रायमरी मेडिकल क्वालिफिकेशन मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे