
बुलढाणा-Buldana गेल्या दहा दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, या आमरण उपोषणाची जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाज बांधव आक्रमक झाले असून त्यांनी आज उपोषण मंडपातचं सरकारची दशक्रिया करून मुंडण आंदोलन केले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.