लोकसभेचा उमेदवार शिवसेनेचाच !

0

अमरावती  AMRAWATI – अमरावतीत रविवारी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यात प्रहारचे अध्यक्ष आ बच्चू कडू यांनी दांडी मारली. दुसरीकडे या मेळाव्यात शिंदे गटातील शिवसेनेचे नेते व आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी थेट अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा करत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल जनतेत नाराजी आहे व विद्यमान खासदार बदलल्या जाईल अशी भूमिका व्यक्त केली. रवी राणा व नवनीत राणा यांनी घटक पक्षाला अत्यंत वाईट वागणूक दिली, त्यामुळे बच्चू कडू देखील नाराज आहेत, असंही त्यांनी म्हटल्याने महायुतीत असंतोष धुमसत असल्याचे उघड झाले