पवारांना जाणता राजा का म्हणता,कुठं लढायला गेले होते?-नरेंद्र पाटील

0

सातारा:छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमानकारक भाषेचा वापर करणे अयोग्यच असून कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणे चुकीचे आहे, असे नमूद करताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil comment on Sharad Pawar) यांनी शरद पवार यांना जाणता राजा ही पदवी दिली जात असेल तर मग ते कुठे लढायला गेले होते? या शब्दात विरोधकांचा समाचार घेतला. कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्यांना पदवी देताना शब्दांचा योग्य वापर करावा, असा सल्लाही पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. शिवछत्रपती हे या देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणे चुकीचेच आहे, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबाबत माहिती दिली. पाटील यांनी सांगितले की, काही प्रमाणात समन्वय कमी असल्याने व्याज परताव्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता व्याज परताव्याची प्रकरणे निकालात काढून ती शून्य टक्‍क्यावर आणली जाणार आहेत. महामंडळाची जबाबदारी २०१८ पासून माझ्याकडे आली असून या कालावधीत तीन हजार ५०० कोटींचे कर्जवाटप व ५० हजार लाभार्थी जोडले गेले आहेत. दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी योजनेतही सकारात्मक बदल घडविण्यात येणार आहेत. आर्थिक महामंडळाच्या योजनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विचार सुरू असून याबाबत बैठकही झाली आहे. याचबरोबर महामंडळाच्या योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची संख्या वाढविण्यात येणार असून, येत्या काही वर्षांत एक लाख मराठा उद्योजक तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Shankhnaad News | Ep.46_चित्ता कटरा पनीर भुर्जी आणि अमृतसरी पनीर पकोडा

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा