वाघनखांसाठी करार, सुधीर मुनगंटीवार यांचं जोरदार स्वागत

0

नागपूर NAGPUR  : छत्रपती शिवाजी महाराजांची chhatrapati shivaji maharaj वाघनखं भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये पार पडलेल्या सामजस्य करारानंतर नागपुरात दाखल झालेले राज्याचे सांस्कृतिक कार्य तसेच वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं शुक्रवारी सकाळी नागपुरात विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूर, चंद्रपूर व वर्धा येथील कार्यकर्ते व शिवभक्तांनी त्यांच्या स्वागतासाठी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातनळावर मोठी गर्दी गेली होती. (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) ढोलताशाच्या निनादात झालेल्या या स्वागतानंतर मुनगंटीवार यांचा शिवछत्रपतींची प्रतिमा, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपचे नागपूरचे अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागपुरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

या स्वागतानं भारावलेल्या मुनगंटीवार यांनी लोकांना धन्यवाद दिले. “माझ्या स्वागताबद्दल मी नागपूर, चंद्रपूर व वर्धा येथील शिवभक्तांचे आभार मानते. हे प्रेम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहील. छत्रपतींचे विचार मनोमी पोहोचविण्यासाठी आपण कार्यरत राहू”, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

भारत-पाक सीमेवर छत्रपतींचा पुतळा

दरम्यान, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी माहिती दिली की, भारत-पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात श्रीनगर येथील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘मी पुणेकर’ या संस्थेनं हा पुतळा उभारण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन या प्रकल्पासाठी त्यांना मदत करणार आहे. पुतळ्याची उभारणी झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहूनच धडकी भरेल, असे ते म्हणाले. याच पद्धतीने लंडनमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाचे १६ खासदार आहेत. त्यांनी ब्रिटन सरकारकडून पुतळ्यासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या जमिनीवर महाराष्ट्र शासन एनजीओंच्या मदतीने पुतळा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, वाघनखांच्या मुद्यावर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा समाचार घेतला. पटोले हे देखील महाराष्ट्रातील एक पप्पूच आहेत, त्यांनी आपली वक्तव्यं तपासावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाघनखांच्या बाबतीत अवमान करणारी वक्तव्ये पप्पूचीच पार्टी करू शकते, असे ते म्हणाले.