नवी दिल्ली : देशभरात खळबळ माजविणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात (Shraddha Walker Murder Case) मोठी घडामोड पुढे आली आहे. नराधम आफताबने मेहरौलीच्या जंगलात फेकलेले अवशेष मृतक श्रद्धाचेच असल्याचे वैज्ञानिक परिक्षणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी जंगलात सापडलेल्या अवशेषांची डीएनए चाचणीच्या आधारे तपासणी केली. त्यासाठी श्रद्धाच्या वडीलांचे डिएनए नमूने घेण्यात आले होते. तपासण्यात आलेले अवशेष तिच्या वडीलांच्या डीएनएशी जुळल्याने ते अवशेष श्रद्धाचेच असल्याचे स्पष्ट झाले असून हा सर्वात मोठा सायंटिफीक पुरावा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आता यातील आरोपी आफताब पुनावाला याच्या अडचणी वाढल्या आहेत. या पुराव्यांमुळे तपासाला गती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रद्धा वालकर हत्याकांड उघडकीस आल्यावर पोलिसांनी आफताब पुनावाला याला अटक केली होती. त्याच्या कबुलीजबाबातून पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात शोधमोहिम राबवून हाडांचे काही अवशेष गोळा केले होते. आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या फ्लॅटमधूनही काही पुरावे गोळा करण्यात आले होते. फ्लॅटमध्ये आढळून आलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेण्यात आले. हे सगळे पुरावे न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचवेळी अवशेष श्रद्धाचे आहेत की नाही, हे तपासून पाहण्यासाठी पोलिसांनी तिच्या वडिलांचे डीएनए सँपल घेतले होते. आता दोन्ही सँपल जुळत असल्याने अवशेष श्रद्धाचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी गती येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या पुराव्यानंतर आरोपी आफताबची आणखी चौकशी केली जाणार आहे.
जंगलात सापडलेले हाडांचे अवशेष श्रद्धा वालकरचेच, डीएनए चाचणीतून मिळाले पुरावे
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा