राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर

0

मुंबई : राज्याचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले आहे. हे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असून या धोरणामुळे प्रदूषणविरहित, स्वस्त आणि उर्जेचा मोठा स्त्रोत असलेल्या नविकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील महत्वाच्या इंधनांपैकी एक असणार आहे. जागतिक स्तरावर देखील त्याला फार महत्व आले आहे. या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असल्याने हायड्रोजनच्या किंमती कमी होण्यास देखील यामुळे मदत होणार आहे. आज हायड्रोजनची किंमत 250 रुपये प्रति किलो आहे. मोठ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून २०३५ सालापर्यंत प्रति किलो ७० ते ८० रुपये किलो इतक्या खाली येऊ शकतात, असे जाणकारांना वाटते. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे प्रदूषणही नियंत्रणात येऊ शकेल.