घरापुढे तगडा बंदोबस्त,रविकांत तुपकर गेले कुठे?

0

 

बुलढाणा – सोयाबीन, कापसाच्या दरवाढीसाठी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेणारे स्वाभिमानीचे शेतकरी नेते रविकांत तुपकर Leader Ravikant Tupkar यांच्या अटकेसाठी पोलीस सरसावले आहेत. 19 जानेवारीला रेल्वे रेको आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कालच तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरम्यान, पोलिसांकडून अटकाव होण्याची कुणकुण लागताच, तुपकर भूमिगत झाले आहेत. पोलीस तुपकर यांचा कसून शोध घेत आहेत. आज सकाळ पासूनच बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांच्या घराला गराडा घातला आहे. वारंवार तुपकर घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुपकर नेमके कुठे आहेत? यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उद्या, 19 जानेवारीला सकाळी तुपकर मलकापूर रेल्वेस्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचे तुपकर यांच्या धर्मपत्नी ऍड. शर्वरी तुपकर यांनी सांगितले.

 

 

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live