
स्वरवेद फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘साधना ते सुश्मिता सेन’ हा संगीतमय कार्यक्रम सायंटिफिक हॉल येथे घेण्यात आला. यात गायिका प्रतीक्षा पट्टलवार, अश्विनी लुले,शर्मिला चरलवार, पद्मजा सिन्हा, मनश्री जोशी, सोनाली अय्यर, सीमा सोनुले,प्राची राजाणी, प्रणोती बोन्डे, मेघा हरिदास, राजलक्ष्मी बर्गे यांनी चित्रपट नायिका साधनापासून ते सुश्मिता सेन पर्यंतच्या नायिका आणि गायिकांची सुप्रसिद्ध गाणी प्रस्तुत केली.
यामध्ये लग जा गले, झुमका गिरा रे, दिलबर दिलबर, नैनो मै बदरा छाये, बेदर्दी बालमा तुझको, रैना बिती जाये, अजी रुठ कर अशी एकापेक्षा एक सुप्रसिद्ध गाणी गायिकांनी सादर केली. गायिकांना सहगायक मनोज जोशी, धीरज आटे, रवी अय्यर यांनी युगल गीतांमध्ये उत्तम साथ दिली.
तबल्यावर रवी सातफळे, गिटारवर मनोज विश्वकर्मा, सिंथेसायझरवर आर्य पुराणकर, ऑक्टोपॅडवर विशाल दहासहस्त्र, हार्मोनियमवर जगदीश दळवी, ढोलकवर उदय राजकारणे यांनी तर मायनरवर तुषार विघ्ने व काव्य विघ्ने यांनी साथ दिली. कार्यक्रममाचे निवेदन प्राचार्य उज्ज्वला अंधारे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या परिणिता फुके, माया हाडे, रोहन कपाई यांच्या हस्ते सर्व गायिकाचा स्वर्गीय प्रतिभा सातफळे स्मृती स्वर-प्रतिभा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.