न्या. रोहित देव यांचा अचानक राजीनामा

0

नागपूर-मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांची अचानक राजीनामा दिल्याने विधी वर्तुळात खळबळ माजली आहे. न्या. देव यांनी न्यायालयात आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर करीत सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर करताना न्या. देव यांनी सर्व उपस्थितांपुढे दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. माझा कोणावरही राग नसून माझ्यामुळे कोणी दुखावले गेल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असे वक्तव्य न्या. देव यांनी डायस सोडण्यापूर्वी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी वकीलांवर नाराजीही व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. तथापि, नेमक्या कोणत्या कारणापायी व्यथित होऊन न्या. देव यांनी राजीनामा दिला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधी वर्तुळात मात्र या राजीनाम्याने खळबळ निर्माण झाली आहे. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी न्या. देव हे राज्याचे महाधिवक्ता होते. ते डिसेंबर २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार होते, अशीही माहिती आहे.