तहसीलदार व अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात

0

गोंदिया(Gondia), १५ मे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सह मुख्याधिकारी अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर 4 लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे 7 मे ला गोंदियाच्या गोरेगाव येथे तहसीलदार व नायब तहसीलदार व अन्य एक ईसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असुन त्याला 12 लक्ष 15 हजार 630 रकमेवर 15 टक्के लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना ही रक्कम देणे मान्य नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पडताळणी केली असता, यामध्ये 6 आरोपींना रंगेहात पकडले. त्यापैकी 5 आरोपींना सध्या ताब्यात घेतले असुन अन्य एक आरोपी अटकेबाहेर आहे.

ताब्यात असलेल्या आरोपींमध्ये तेजराम मडावी (66) नगराध्यक्ष, शरद हलमारे (56) नायब तहसीलदार मुख्याधिकारी न. प. अतिरिक्त पदभार, असलेश अंबादे (35) बांधकाम सभापती, महेंद्र वंजारी (34) नगरसेवक, शुभम येरणे (27) खाजगी इसम हे ताब्यात असुन, जुबेर अलीम शेख (नगरसेविका पती खाजगी इसम) हा अद्यापही फरार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा