
(nagpur)नागपूर -नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर सोमवारी वंचित बहुजन आघाडीची स्त्री मुक्ती परिषद सुरू असताना व्यासपीठाचा बॅक ड्रॉप लोखंडी अँगलसह मागच्या बाजूने कोसळला.सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही,मात्र अनर्थ टळला.
विशेष म्हणजे जेव्हा हा बॅकड्रॉप कोसळला, तेव्हा (Ad Prakash Ambedkar) ऍड प्रकाश आंबेडकर व्यासपीठावर यायचे होते.
मात्र संपूर्ण बॅकड्रॉप लोखंडी अँगल सह मागे कोसळल्यामुळे सभास्थानी काही काळासाठी खळबळ माजली.
धक्कादायक बाब म्हणजे हजारोंच्या गर्दीत, सर्वांच्या उपस्थितीत बॅकड्रॉप कोसळल्यानंतर तिथे उपस्थित मीडियाकर्मी, फोटोग्राफर जेव्हा व्यासपीठाच्या मागे जाऊन घटनेचे फोटो घेण्याचे, चित्रीकरण करण्याचे प्रयत्न करत होते. कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा, धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog


















