Home Artical Blog हिंदी गाण्यांच्या ‘गोल्डन हिट्स’ने रंगली मैफल

हिंदी गाण्यांच्या ‘गोल्डन हिट्स’ने रंगली मैफल

0

नागपूर(Nagpur), २५ मार्च :
श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी प्रस्तुत ‘गोल्डन हिट्स’ या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात जुन्या आणि नव्या गाजलेल्या हिंदी गाण्यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळाला. कार्यक्रमात गायक-गायिकांनी आपापल्या सुरेल आवाजात लोकप्रिय गीते सादर करत वातावरण भारावून टाकले.
या कार्यक्रमात अतिथी गायिका ज्योती बनकर यांनी “ए दिल मुझे बता दे”, “धिरेधिरे से मेरे”, “बाजीगर”, “राह मै ऊनसे”, “परदेसिया” तर निकेता जोशी यांनी “बोले रे पपिहा”, “ले गई ले गई” ही गाणी सादर करून रसिकांना नॉस्‍टेल्‍‍ज‍िक केले. आरती बुरडकर यांनी “ये मुलाकात एक बहाना”, मोहिनी देशपांडे यांनी “तु जहा जहा चलेगा”, गीता बावनकर यांनी “ ओ जाने जा”, कृष्णा जोशी यांनी “जिया लागेना”, दत्तात्रय वझारकर यांनी “दिये जलते है”, श्रीपाद देशमुख यांनी “तेरे निगाहो मै”, सुनील माहूरकर यांनी पलपल दिल के”, हर्षवर्धन वैरागरे यांनी “यह कोई नाही” , हेमंत गांडोले यांनी “दिल कया करे” आणि सौरभ कुळकर्णी यांनी “तेरी दिवानी” निखिल पंडित यांनी “चला जाता हूं” आणि नीरजा धांडे गाणी सादर केली तर “रिमझिम रिमझिम”, “वादा रहा सनम”, “अंके तेरी बाहो मे”, “डोला रे डोला”, “दिल है के मानता नही”, “गली गली मै”, “रात के हमसफर”, “साथिया तूने क्या किया”, “कया यही प्यार है”, “चुरा लिया है तुमने”, “कया खुब लगती हो”, “हर किसी को”, “याद आ रही है”, या सारखी द्वंव गीते सादर केली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा समीर पंडित यांनी सांभाळली. संगीत साथीसाठी कीबोर्डवर परिमल जोशी, ऑक्टोपॅडवर महिंद्र वातुळकर , तबल्यावर पंकज यादव आणि गिटारवर ऋग्वेद पांडे यांनी उत्तमरीत्या साथ दिली.