
अॅडव्हान्टेज विदर्भ 2026 मध्ये
एमकेएसएस स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे आयोजन
नागपूर (NAGPUR) 8 फेब्रुवारी :- ‘अॅडव्हान्टेज विदर्भ 2026 –खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या एमकेएसएस स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांच्यावतीने दुसऱ्या ग्रॅज्युएट फॅशन शोचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीने हा फॅशन शो गाजला.
फॅशन शोमध्ये बी.ए. फॅशन डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी शाश्वत फॅशनचा संदेश देणाऱ्या या शोमध्ये एकूण सहा संकल्पनांवर आधारित डिझाईन सादर केले. ‘टेम्पल ऑफ इंडिया’ अंतर्गत हातमाग महामंडळाने निःशुल्क पुरविलेल्या करवत किनार साडीवर कलाकृती साकारण्यात आल्या. ‘दि पॅलेस पॅलेट – फोर गेट्स, वन स्टोरी’ या संकल्पनेत जयपूरच्या शहरद्वारावरील कलात्मक कुसर कापडांवर ब्लॉक प्रिंट व स्मॉकिंग तंत्रातून उलगडली. ‘डेनिम रिव्होव्हन’ मध्ये सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्सकडून निःशुल्क मिळालेल्या डिफेक्टिव्ह डेनिमवर सृजनशील डिझाईन सादर करण्यात आल्या. ‘डेजर्ट रिदम्स’ मध्ये बंजारा समुदायाच्या पारंपरिक काचकामाचा वापर दिसून आला. ‘फ्लोरल व्हिस्पर’ मध्ये सुदामणी फाउंडेशनकडून मिळालेल्या कापडावर हाताने पेंटिंग व विणकाम करून फुलांच्या विविध छटा साकारल्या, तर ‘रिव्ह्यू राऊंड’मध्ये मागील वर्षीच्या पहिल्या बॅचच्या निवडक डिझाईनचे सादरीकरण करण्यात आले.

सोनाली कुलकर्णी यांनी ‘डेनिम रिव्होव्हन’ कलेक्शनचे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वापर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नितीन श्रीवास्तव, मधू सिंग आणि ध्रुव हिंगले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
कार्यक्रमास महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सदस्य व सॉफ्ट नागपूर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सीए अभय कुलकर्णी, सदस्य सत्यजीत चितळे, सचिव डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशीष काळे, सचिव डॉ विजयकुमार शर्मा, पंकज भोकरे, हेमंत अंबासेलकर, विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख मार्गदर्शक डॉ. मंजू हुंडेकर, मधुबाला साबू, श्रीकांत गाडगे, निधी गांधी, रोटरी वेस्ट नागपूरचे अभय गांधी व शर्मिष्ठा गांधी, हातमाग महामंडळाचे सहसंचालक गंगाधर गजभिये, रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रभारी प्राचार्या क्रिपा सावलानी, सहायक प्रशासकीय अधिकारी आनंद काळे, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, पालकवर्ग तसेच फॅशन डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी चकोले, शरायू बत्रा, नियती पाठक, डॉ. प्रवीण गेडाम, स्वर्णीमा बाराहाते, गायत्री मांजरखेडे, तेजराम वहिले, कृष्णा सातारकर, अश्विनी बुजोणे, मेघा ठाकूर तसेच बी.ए. फॅशन डिझाईनच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियती पाठक यांनी केले.














