काशी-मथुरा मुद्दाही मार्गी लागणार

0

 

 नागपूर (Nagpur) –अयोध्येत भव्य श्री राम मंदिर झाले, 370 कलम हटवले गेले,सीएए लागू झाले, आता समान नागरिक कायदा देखील उत्तराखंड पाठोपाठ देशात लागू होणार आहे इतकेच नव्हे तर कुठल्याही संघर्षाशिवाय काशी -मथुरा मुद्दाही मार्गी लागणार, इतकेच नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरही भारताच्या ताब्यात येणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थेट पाकिस्तानात रस्ते बांधणार असा दावा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ प्रवीण तोगडिया यांनी केला. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी आठ कोटी लोकांनी सव्वा रुपये याप्रमाणे आपला निधी दिला.आठ लाख हिंदूंच्या बलिदानातून हे मंदिर उभे राहिले, प्रत्येकाचे यात योगदान आहे.

आम्ही साठ हजार घनफूट दगड कोरण्याचे कामात सहभाग दिला. आज मंदिर उभे झाले यातील 54 हजार घनफूट दगडाचा वापर करण्यात आला असेही त्यांनी सांगितले.भविष्यकाळात समृद्ध हिंदू,सुरक्षित हिंदू हे आमचे ध्येय असून त्यासाठी साप्ताहिक हनुमान चालीसा पठण देशभरात सुरू करण्यात आले आहे. नागपूर शहरात 61 ठिकाणी हे होत असून देशभरात सध्या 13000 ठिकाणी हा पाठ होत आहे. वर्षभरात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा केंद्र तयार होतील. या ठिकाणी गरिबांना मोफत अन्न,मोफत आरोग्य सेवा आणि 24 तास मदतीसाठी हेल्पलाईन, कार्यकर्ते तत्पर राहतील.भविष्यात रोजगारही दिला जाईल. डीडीओच्या धर्तीवर एचडीओ हनुमान चालीसा डेव्हलपमेंट सेंटर ऑफिसर असे या केंद्राचे नाव असणार आहे. लोकसभा निवडणुकी पाठोपाठ जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली. आपण कधी कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर नसल्याने भाजपचा प्रचार करणार नाही. आपल्याला मोदी किंवा अमित शहा यांचा कुठलाही विरोध नव्हता, राहुल गांधी हिंदुत्व विरोधी असल्याचे आपण प्रमाणपत्र देणार नाही, आरक्षण प्रश्नी वादविवादात पडणार नाही असेही तोगडिया यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षातील सरकारच्या कामाचे मूल्यमापन हे आगामी निवडणुकीत जनताच करणार असून अधिकाधिक मतदान करावे, आपल्या इच्छेचे सरकार निवडावे असे आवाहन त्यांनी केले. मात्र ईव्हीएम संदर्भात केल्या जात असलेल्या आरोपांना उत्तर देताना आपण डॉक्टर आहोत इंजिनियर नव्हे अशी भूमिका व्यक्त केली. यावेळी विदर्भ प्रदेश महामंत्री किशोर दिकोंडवार, मोतीलाल चौधरी, अस्मिता गिरडकर आदी उपस्थित होते.