नागपूर – नागपुरातील दोन व्यावसायिकांच्या कोंढालीतील फार्म हाऊसवर गोळ्या घालून हत्या, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आणि नंतर ते मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून वर्धा नदीत फेकून देण्याच्या बहुचर्चित ‘डबल मर्डर’चा सूत्रधार ओंकार तलमले याने १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. ‘नासा’मध्ये नोकरी लावून देत असल्याची थाप मारुन त्याने या बेरोजगारांना गंडा लावला आहे. नागपूरात रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये रिक्त पदे आहेत. नोकरी लाऊन देतो म्हणून आरोपीने बेरोजगारांची ५.३१ कोटींची फसवणुक केली आहे. हाच पैसा परत करण्यासाठी युवकानी तगादा लावण्यात आल्याने पैशाच्या हव्यासापोटी त्याने हे हत्याकांड आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घडविले. या प्रकरणात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन नागपूर पोलीसांनी तपास सुरु केला आहे. ओंकार तलमले कर्जात आकंठ बुडाला होता, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने नागपुरातील दोन व्यापाऱ्यांच्या हत्येचा कट रचला. त्याचावर मकोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरु आल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी दिली